ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई!अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांना गावसंवाद दौऱ्यात मिळतोय चांगला प्रतिसाद!
प्रशासक न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार सौ सुवर्णा पाचपुते या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघातील विविध गावांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत हे गावदौरे करत असताना त्यांना सर्व ठिकाणी उदंड प्रतिसाद लाभत आहे
या गावसंवाद दौऱ्याबद्दल सौ सुवर्णा पाचपुते यांना विचारले असता श्रीगोंदा-नगर विधानसभा निवडणुकीच्या गाव संवाद दौरा मध्ये प्रत्येक गावातील मायबाप जनतेचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय,तो अभूतपूर्व आहे गावागावात नागरिकांनी जो सन्मान आणि आशिर्वाद दिला, त्यातूनच स्पष्ट होतंय की, ही निवडणूक जनतेची आहे आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढली जात आहे अशी प्रतिक्रिया तसेच जनतेच्या या विश्वासावर निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या हितासाठी सदैव काम करणार असल्याचा संकल्प केल्याचे देखील त्यांनी लोकांना सांगितले आहे
तसेच ही लढाई नुसती निवडणुकीची नाही, तर एक संघर्ष आहे, जो सामान्य माणसांच्या आवाजाला बळ देतो. धनशक्तीच्या प्रभावापेक्षा जनशक्तीची ताकद मोठी आहे, हे आपल्या एकजुटीच्या माध्यमातून दाखवायचं आहे. आपले अमूल्य मतदान म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा आहे असे लोकांना सांगत येत्या २० तारखेला प्रेशर कुकर या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन पाचपुते यांनी सर्वांना केले.
'जनशक्ती विरुद्ध धनशक्ती'
श्रीगोंदा - नगर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गावभेट दौऱ्यावर असताना विविध गावांमध्ये मला भरभरून सन्मान व पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक गावातील नागरिकांनी या लढाईला 'जनशक्ती विरुद्ध धनशक्ती' असं नाव दिलं आहे. जनतेच्या या आत्मीयतेला मी सलाम करते! आपले मतदान आणि आशीर्वाद हीच खरी ताकद आहे. या निवडणुकीत मला आपले आशीर्वादरूपी "प्रेशर कूकर" या चिन्ह समोरील बटन दाबून जनशक्तीला प्रबळ करण्याचे आवाहन करत आहे - सुवर्णा पाचपुते
ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई!अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांना गावसंवाद दौऱ्यात मिळतोय चांगला प्रतिसाद!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: