आता परिवर्तन अटळ!महाविकास आघाडीला पोषक वातावरण,संतोष इथापे यांचा दावा!


प्रशासक न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ 

(श्रीगोंदा):श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या निरीक्षण दौऱ्यानंतर परिवर्तनाची लाट स्पष्ट दिसू लागली आहे. ‘भाजप आणि आमदार बबनराव पाचपुते यांना सत्ता देऊन देखील प्रश्नांचे निराकरण न झाल्याने यंदा पुन्हा त्यांनाच उमेदवारी देऊन नेमके काय साध्य होणार?’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी श्री संतोष इथापे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

सहकार,शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करताना त्यांनी शेतीमालाचे भाव, निर्यात बंदी आणि परिणामी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या तोट्याचे प्रश्न मांडले. “विकासकामांत अनेक निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. विकासाच्या नावाखाली मालामाल झालेल्या नेत्यांना लोक दारात आल्यावर थारा देणार नाहीत,” असे इथापे यांनी सांगितले.त्यांनी पुढे नमूद केले की, श्रीगोंद्यात बहुरंगी लढतीत पाचपुतेंचा नेहमी फायदा होत आला आहे. मात्र, यावेळच्या निवडणुकीत परिस्थिती बदललेली दिसत आहे. मतदारांच्या मनात ‘पाचपुतेंना पुन्हा सत्तेत न आणण्याची’ भावना निर्माण झाली आहे. मत विभागणीमुळे त्यांचा विजय आता धूसर वाटत आहे, असे ते म्हणाले.

श्रीगोंदा मतदारसंघात या निवडणुकीत मतदार आपले मतदान वाया घालवणार नाहीत,असा विश्वास इथापे यांनी व्यक्त केला. “अपक्ष उमेदवार किंवा महाविकास आघाडी यामध्ये मतदारांना पर्याय मिळाला असून, त्याबाबत सुज्ञ मतदार निर्णय घेतील,” असेही त्यांनी नमूद केले.

प्रलंबित मुद्द्यांची नकारात्मकता पाचपुते यांच्यासाठी ठरणार घातक…
तालुक्यातील एमआयडीसीचे मुद्दे, घोड कुकडी आवर्तनातील अनागोंदी कारभार, रस्त्यांची दुरावस्था, तसेच जलजीवन मिशनच्या अपयशी कामामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे सर्व मुद्दे पाचपुते यांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्याचे इथापे यांनी सांगितले.

श्रीगोंदा तालुक्यातील या निवडणुकीत परिवर्तनाची स्पष्ट लाट पाहायला मिळत आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना मतदार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत असे मत संतोष इथापे यांनी व्यक्त केले

आता परिवर्तन अटळ!महाविकास आघाडीला पोषक वातावरण,संतोष इथापे यांचा दावा! आता परिवर्तन अटळ!महाविकास आघाडीला पोषक वातावरण,संतोष इथापे यांचा दावा! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १३, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.