प्रशासक न्यूज,दिनांक १३ नोव्हेंबर २०२४
(श्रीगोंदा):अहमदनगरच्या २२६ श्रीगोंदा/नगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. यामध्ये विक्रम पाचपुते, अनुराधाताई नागवडे, राहुल जगताप यांच्या बरोबरीनेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब शेलार यांनीही प्रचारात आक्रमक प्रवेश केला आहे. शेलार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या सक्रिय कार्यामुळे श्रीगोंदा तालुका आणि अहमदनगर तालुक्यातील हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे.
अण्णासाहेब शेलार आणि त्यांचे चिरंजीव बेलवंडी गावचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी ओबीसी, मागासवर्गीय आणि नवबौद्ध घटकांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेने वंचित बहुजन आघाडीला या घटकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. शेलार यांनी विविध भागांमध्ये कॉर्नर सभा, बैठका आणि चर्चासत्रांचे आयोजन करून लोकांच्या समस्या समजून घेण्याचे काम करीत आहेत. या उपक्रमांमधून ओबीसी आणि मागासवर्गीयांसह अल्पसंख्यांक समाजातील बांधवांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यास शेलार यांना यश आले आहे.
काल मांडवगण येथे झालेल्या कॉर्नर सभेत शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेतला, ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे विचार मानणारे आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारीही शेलार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक नामांकित सर्वेक्षणांनुसार अण्णासाहेब शेलार हे निर्णायक मतसंख्या मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आंबेडकरवादी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आणि शेलार यांचा राजकीय प्रभाव या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम निवडणुकीत दिसून येत आहे. त्यामुळे अण्णासाहेब शेलार हे प्रस्थापित नेत्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तसेच, आगामी काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित झाल्यास,मतदारसंघातील मतांचे समीकरण अण्णासाहेब शेलार यांच्या बाजूने बदलू शकते. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आण्णासाहेब शेलार यांची प्रचारात आघाडी!निवडणूक होणार रंगतदार..
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: