पक्षप्रमुखांची तोफ धडाडणार,अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी हे मोठे नेते उद्या श्रीगोंद्यात घेणार सभा!
प्रशासक न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४
(श्रीगोंदा):महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उद्या गुरुवार दि.१४ रोजी दुपारी १२ वाजता श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदिर पटांगणामध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी दिली.
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या वतीने सौ.अनुराधा नागवडे या "मशाल" चिन्हावर निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे श्रीगोंद्यात येणार आहेत उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच श्रीगोंद्यात सभा घेणार असल्यामुळे उद्या होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सदर सभेकरिता राष्ट्रवादीच्या खासदार फौजीया खान,मराठा मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष सुभान अली खान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाबासाहेब भोस,शिवसेना उपनेते साजन पाचपुते,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे.
पक्षप्रमुखांची तोफ धडाडणार,अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी हे मोठे नेते उद्या श्रीगोंद्यात घेणार सभा!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: