प्रशासक न्यूज,दि.१२ नोव्हेंबर २०२४
(श्रीगोंदा):बॅनर फाडून लोकांच्या मनातला माझ्याबद्दलचा विश्वास आपण तोडू शकणार नाहीत कारण हा विश्वास माझ्या कामगिरीचा आहे,माझ्या विचारांचा आहे बॅनर फाडण्यापेक्षा विकासाची आणि जनतेच्या कल्याणाची चर्चा करूया. मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करूया आणि या भागाला उन्नतीच्या मार्गावर नेऊया. मला श्रीगोंद्यातील जनतेचा संपूर्ण विश्वास आहे की ते नेहमीच काम करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देतील, हिंसक कृतींना नव्हे अशी प्रतिक्रिया सौ सुवर्णा पाचपुते यांनी माध्यमांशी बोलताना दिली
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचा सध्या गावोगावी प्रचार दौरा सुरू आहे त्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी निवडणुकीचे बॅनर लावले आहेत काही ठिकाणचे बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहेत त्याबद्दल त्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. श्रीगोंदा - अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीचे बॅनर फाडण्याचा प्रकार घडला, हे दुर्दैवी आहे. यावरून स्पष्ट होते की, विरोधकांना माझ्या उमेदवारीची चांगलीच धास्ती वाटते. हा अपप्रकार त्यांनी माझ्यावर केलेल्या वैचारिक हल्ल्याचाच एक भाग आहे. पण मला इतकंच सांगायचं आहे - बॅनर फाडून लोकांच्या मनातला माझ्याबद्दलचा विश्वास आपण तोडू शकणार नाही. कारण हा विश्वास माझ्या कामगिरीचा आहे, माझ्या विचारांचा आहे आणि श्रीगोंदा मतदारसंघाच्या गोरगरीब, मायबाप जनतेचा केलेल्या कामाचा आहे.
मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहावे, रोजगार निर्माण करावा, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून द्याव्यात, हेच माझे ध्येय आहे. आपली निवडणूक ही फक्त एक लढाई नाही; ती एक संधी आहे श्रीगोंद्याला बदलण्याची, प्रगतीच्या दिशेने नेण्याची. आपली लढाई ही विचारांशी आहे, नकारात्मक राजकारणाशी नाही. विरोधकांना एकच सांगते - लोकशाहीत विचारांनीच लढा देऊया, असे फक्त बॅनर फाडून नाही तर जनतेच्या समस्यांकडे लक्ष देऊन मतदारांचा विश्वास जिंकता येतो असे मत अपक्ष उमेदवार सौ सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केले
बॅनर फाडले तरी लोकांच्या मनातला माझ्याबद्दलचा विश्वास कसा तोडणार?सौ.सुवर्णा पाचपुते!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: