दहा लाख मे.टन गाळपासह जिल्ह्यात एक नंबरचा भाव देणार..बाबुराव बोत्रे!


प्रशासक न्यूज,दि.११ नोव्हेंबर २०२४

गौरी शुगर साखर कारखान्याला रिफायनरी सिस्टीम आहे त्यामुळे चांगल्या दर्जाची साखर तयार करता येते या गाळप हंगामात दहा लाख मे टन उसाचे गाळप करुन अहिल्यानगर जिल्ह्यात नंबर एकचा भाव देणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांनी हिरडगाव येथे बोलताना केले. गौरी शुगरचा गाळप हंगाम शुभारंभ आज बाबुराव बोत्रे पाटील व रेखा बोत्रे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते 

गौरी शुगरचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील पुढे म्हणाले की आ. बबनराव पाचपुते यांनी चांगल्या भावनेने हिरडगाव फाट्यावर साखर कारखाना उभा केला होता पण अपयश आले आजही ते कारखान्याशी फोन करतात उसाला जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे यावर चर्चा करतात. चांगले गाळप करुन शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्त भाव कामगारांना वेळेवर पगार हे गौरी शुगर चा मुख्य उद्देश आहे गेल्या गाळप हंगामात ऊसाला 3006 रु प्रतिटन भाव दिला दिवाळीला शेतकऱ्यांना ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर दिली. शेतकऱ्यांनी गौरी शुगरला चांगला ऊस घालावा गौरी शुगरची टीम शेतकऱ्यांना पुर्ण सहकार्य करणार आहे असेही बाबुराव बोत्रेपाटील म्हणाले. 

यावेळी मिलिंद दरेकर संतोष दरेकर आत्माराम फराटे यांची भाषणे झाली. यावेळी संपतराव दरेकर मारुती औटी बाळासाहेब घोलप भाऊ औटी सचीन चौधरी रामदास दरेकर बाळासाहेब वाळके उपाध्यक्ष होते प्रास्ताविक व्यवस्थापक रोहिदास यादव यांनी केले आहे आभार नवनाथ देवकर यांनी मानले 
दहा लाख मे.टन गाळपासह जिल्ह्यात एक नंबरचा भाव देणार..बाबुराव बोत्रे! दहा लाख मे.टन गाळपासह जिल्ह्यात एक नंबरचा भाव देणार..बाबुराव बोत्रे! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर ११, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.