प्रशासक न्यूज,दि.१० नोव्हेंबर २०२४
अगोदर माजी आमदार राहुल जगताप यांना विरोध करणाऱ्या महायुती सरकारने महाविकास आघाडीची उमेदवारी अनुराधा नागवडे यांना जाहीर झाल्यामुळे आपला पवित्रा बदलला व राहुल जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवावी म्हणूनच जिल्हा बँकेच्या माध्यमातून कुकडी सहकारी साखर कारखान्यासाठी २५ कोटी रुपयांचे कर्ज तात्काळ मंजूर करून दिल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी मांडवगण येथे बोलताना केला.
भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली होती, परंतु समोरासमोर लढत झाल्यास पाचपुते यांना निवडणूक अवघड जाते हा इतिहास लक्षात घेऊन त्यांनी ही लढत तिरंगी होण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. पण पाचपुते यांनीही नंतर पक्षाला कोंडीत पकडत प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी मागे घेऊन सर्व्हेत मागे असलेल्या विक्रम पाचपुते यांना निवडणूक लढवण्यासाठी पुढे करून पण ते निवडून येणार नाहीत असा विश्वास भाजप ला असल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना आतून पुरस्कृत केल्याचा सनसनाटी खुलासा देखील भोस यांनी यावेळी केला.
राज्यात महाविकास आघाडीची लाट असल्याने अनुराधा नागवडे भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास भोस यांनी यावेळी व्यक्त केला. जगताप यांनी बंडखोरी केली असली तरी विक्रम पाचपुते निवडून येऊ शकत नाहीत अशा अनुषंगाने भाजपनेच ती पुरस्कृत केली आहे, त्यामुळे जनतेने कसल्याही कारणाने विचलित न होता महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
ते तर भाजप पुरस्कृत उमेदवार,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचा आरोप!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: