प्रशासक न्यूज,दि.२४ऑक्टोबर२०२४
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू स्व. सदाशिव पाचपुते यांनी यावेळी आम्हाला पाठिंबा द्या भविष्यात पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे आवाहन केल्यामुळे त्या निवडणुकीत सौ.अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता राजेंद्र दादा नागवडे आणि सौ अनुराधा नागवडे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना सुद्धा भाजप उमेदवार आ बबनराव पाचपुते हे विजयी झाले होते असा दावा आता नागवडे यांचे कार्यकर्ते करत आहेत
*साजन पाचपुते यांनी वडिलांचा शब्द पाळला*
कोरोना काळात स्व.सदाशिव आण्णा पाचपुते यांचे निधन झाले पण त्यांचे पुत्र शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी मात्र आपल्या पित्याने नागवडे कुटुंबाला दिलेला शब्द पाळला नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मदत करतानाच आता विधानसभा निवडणुकीत साजन पाचपुते यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी स्वतःला मिळत असताना सुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या उमेदवारीचा त्याग करत स्वतः ऐवजी त्यांनी सौ.अनुराधा नागवडे यांच्या नावाची शिफारस करून त्यांना पाठिंबा देऊन वडिलांचा शब्द पाळला अशी भावने नागवडे गटाकडून व्यक्त होत आहे
२०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व.कुंडलिक तात्या जगताप यांनी यावेळी राहुल जगताप यांना पाठिंबा द्या भविष्यात आम्ही (जगताप गट) तुम्हाला पाठिंबा देऊ असे आश्वासन नागवडे कुटुंबाला दिले होते त्यावेळी ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार स्व.शिवाजीराव नागवडे यांनी जगताप यांचा प्रस्ताव स्वीकारत आम्ही उमेदवारी करणार नाही असे जाहीर केले त्याचवेळी राज्यात आघाडी आणि युती ने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला काँग्रेसने स्व.शिवाजीराव नागवडे यांना एबी फॉर्म पाठवत उमेदवारी दिलेली असताना सुद्धा स्व.नागवडे यांनी मी खासदार शरद पवार यांना राहुल जगताप यांच्या विजयासाठी शब्द दिला असल्याचे सांगत नम्रपणे चालून आलेली उमेदवारी नाकारली होती
*आता राहुल जगताप यांनी पाठींबा द्यावा*
महाविकास आघाडीची उमेदवारी सौ.अनुराधा नागवडे यांना मिळाल्याने माजी आमदार राहुल दादा जगताप यांनी मनाचा मोठेपण दाखवत १० वर्षापूर्वी नागवडे गटाने प्रत्येक गावात आणि ज्या ठिकाणी जगताप गटाला कार्यकर्ते संख्या कमी असताना मेहनत घेऊन विजयी केले त्यामुळे जगताप यांनी आता सौ.अनुराधा नागवडे यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यावेळी जगताप यांचे काम करणाऱ्या नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे
*जगताप,पाचपुते यांनी मदतीची परतफेड करावी*
नागवडे गटाने सहकारात बिनविरोध निवडणुकीत विरोधकांना मदत केली विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांना मदत केली आता नागवडे २००९ नंतर १५ वर्षांनी निवडणुकीत उतरले आहेत त्यामुळे पाचपुते व जगताप या दोघांनी अनुराधा नागवडे यांना मदत करून मदतीची परतफेड करावी अशी मागणी नागवडे गट करत आहे

"पाचपुते,जगताप"यांनी मदतीची परतफेड करावी!यांची मागणी
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: