प्रशासक न्यूज,दि.२३ऑक्टोबर २०२४
नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ.अनुराधा नागवडे यांनी हजारो सर्थकांसह आज बुधवारी दुपारी महाविकास आघाडीतील शिवसेना(ठाकरे गट)पक्षात प्रवेश केला.यावेळी प्रवेश होताच ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म सौ.अनुराधा नागवडे यांना देण्यात आला त्यामुळे अनुराधा नागवडे आता मशाल चिन्ह हाती घेऊन मैदानात उतरणार आहेत
पक्ष प्रवेशा वेळी बोलताना माजी मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले माझ्यावर घरी बसून कामकाज पाहतात असा आरोप होतो त्यांना आता समजले आहे की दररोज मातोश्री वर राज्यातील बडे नेते प्रवेश का करत आहेत.मशाल नागवडे दांपत्याने सतत पेटती ठेवावी विरोधक यशस्वी होणार नाहीत उपनेते साजन पाचपुते यांच्यासाठी आम्ही आघाडी कडे जागा मागत होतो परंतु साजन यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अनुराधा नागवडे यांची शिफारस केली नागवडे या निश्चितच विजयी होतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला

खासदार संजय राऊत,उपनेते साजन पाचपुते,सुनंदा पाचपुते,दीपकशेठ नागवडे,आदेशशेठ नागवडे यांच्यासहश्रीगोंदा,अहिल्यानगर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या प्रवेशावेळी उपस्थित होते.पक्ष प्रवेश होताच मातोश्री बाहेर शिवसेना कार्यकर्ते व नागवडे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत नागवडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या
दरम्यान पक्ष प्रवेश आणि ए बी फॉर्म मिळताच श्रीगोंदा मतदार संघात ठीक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
सौ अनुराधा नागवडे म्हणाल्या,श्रीगोंदा मतदार संघात काम करण्यासाठी लोकांनी आग्रह धरला नागवडे कुटुंबाची जनतेशी असलेली नाळ सर्वांना ठाऊक आहे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची नागवडे कुटुंबात क्षमता आहे हे देखील माहीत आहे शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्यासह मतदार संघातील नेत्यांनी मदत केली माजी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत यांनी विश्वास ठेवला आपण चांगले काम करून पक्ष आणि मतदार संघाचा नावलौकिक वाढवू असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले
*बाबासाहेब भोस यांनी दिलेला शब्द अखेर खरा ठरला,कार्यकर्त्यांमध्ये समाधान*
रविवारी वांगदरी येथील मेळाव्यात बोलताना ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी २ दिवसात निर्णय होईल महाविकास आघाडीतील पक्षाची उमेदवारी मिळवू हा दिलेला शब्द पूर्ण झाल्यामुळे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदार संघात समाधानाचे वातावरण आहे

प्रवेश झाला,फॉर्म मिळाला उमेदवारी निश्चित!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: