गोरख आळेकर यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल! विधानसभा लढवण्याची शक्यता..या पक्षाच्या नेत्याची घेतली भेट!


प्रशासक न्यूज,दि.२३ऑक्टोबर२०२४

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत चालली आहे तशी श्रीगोंद्यात निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या सुद्धा वाढत आहे लोकसभेला ४४,५९७ एवढी भरघोस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले उमेदवार श्री.गोरख आळेकर यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत आळेकर यांच्याकडे ओबीसी नेतृत्व म्हणून सुद्धा पाहिलं जात

नुकतीच आळेकर यांनी ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांची भेट घेत उमेदवारी मागितली असून शेंडगे यांनी देखील आळेकर यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे त्यामुळे गोरख आळेकर विधानसभेची उमेदवारी करण्याची शक्यता बळावली आहे

विधानसभा उमेदवारी बाबत गोरख आळेकर यांना विचारले असता श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते जसेच्या तसे आहेत त्यात प्रामुख्याने साकळाई योजना,डीवाय दहाचा प्रश्न ,एमआयडीसीचा प्रश्न,युवकांचे प्रश्न हे प्रश्न आणि त्याचे उत्तरे प्रस्थापित राज्यकर्ते यांनी जनतेला अद्याप पर्यंत दिलेले नाहीतद दरवेळेस जनतेला वेगवेगळी विकासाची आमिषे दाखवून खुळ्यात काढून सत्ता मिळवली या सत्तेतून जनतेचा विकास कमी आणि स्वतःचा व नातेवाईक यांचाच जास्त विकास केलेला दिसतो.या सर्व प्रश्नांची कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून लोकांचा सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास गोरख आळेकर यांनी बोलून दाखवला
 तसेच श्रीगोंदा तालुक्यातून कुकडी कॅनल कर्जत जामखेड करमाळ्याला जातो. भर उन्हाळ्यात आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत कॅनॉल भरून वाहतो परंतु आपल्या शेतकऱ्यांना त्यातील किती दिवस आमचा शेतकरी बांधव सहन करणार. 
आज जे उमेदवार करणार आहेत इच्छुक आहेत हे तरी आपल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत न्याय देऊ शकलेत का इथून पुढे यांना जर मतदान केलं तर हे आपल्याला न्याय देतील का ?हा एक प्रश्न आज आमच्या शेतकरी बांधवांकडे उभा राहतो. आपण आपल्या तालुक्याचा कारभारी निवडतोय तो राजा आणि राजपुत्र निवडत नाही याची जाणीव आपल्या तालुक्यातील सर्व मतदारांनी ठेवली पाहिजे. इथे लोकशाही आहे राजेशाही नाही त्यामुळे वारसा माझं कुटुंबातील कोणी व्यक्तीच असला पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? 
नव युवकांचा आवाज म्हणून गोरख आळेकर विधानसभा लढण्याची शक्यता आहे 
गोरख आळेकर यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल! विधानसभा लढवण्याची शक्यता..या पक्षाच्या नेत्याची घेतली भेट!  गोरख आळेकर यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल! विधानसभा लढवण्याची शक्यता..या पक्षाच्या नेत्याची घेतली भेट! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर २२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.