दुःखद बातमी!विचित्र अपघातात या व्यवसायिकाचे निधन!


प्रशासक न्यूज,दि.२६ऑक्टोबर२०२४

दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पिकअप चालकाने अचानक दरवाजा उघडल्यामुळे दुचाकीला धक्का लागून अपघात होऊन त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध कृषी व्यावसायिक ज्ञानेश्वर परसराम आगलावे वय ६८वर्षे यांचे अपघाती निधन झाले आहे
मूळचे राहता तालुक्यातील सावळविहीर बुद्रुक येथील असणारे आगलावे हे सध्या श्रीगोंद्यात स्थायिक झाले होते श्रीगोंदा येथे ते कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते त्यांनी सेवानिवृत्तीनंतर श्रीगोंद्यात कृषीसेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केला होता

 या अपघाता बाबत काही प्रत्यक्षदर्शीकडून समजलेली माहिती अशी की,काल शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आगलावे हे आपल्या दुचाकीवरून शहरातील शनीचौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक(होनराव चौक)या रस्त्याने जात असताना जैन मंदिरासमोर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पिकअप चालकाने पाठीमागे न बघता अचानक पिकअपचा दरवाजा उघडला त्यामुळे आगलावे यांच्या दुचाकीला दरवाजाचा धक्का लागून ते खाली पडले त्यात त्यांना गंभीर मार लागला आजूबाजूच्या काही सजग नागरिकांनी त्यांना तत्काळ श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे ज्ञानेश्वर आगलावे यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले तिथे उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आगलावे यांच्या निधनाबद्दल श्रीगोंद्यातील सर्व कृषी व्यवसायिकांसह नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे


त्यांचे पश्चात मुलगा दोन मुली पत्नी नातवंडे असा मोठा परिवार आहे

दुःखद बातमी!विचित्र अपघातात या व्यवसायिकाचे निधन! दुःखद बातमी!विचित्र अपघातात या व्यवसायिकाचे निधन! Reviewed by Prashasak on ऑक्टोबर २६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.