श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी साडे अकरा वाजता महाविकास आघाडीकडून शिवसेना(ठाकरे गट)पक्षाकडून सौ अनुराधा राजेंद्र नागवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी नागवडे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले या शक्तीप्रदर्शनाची सगळीकडे चर्चा रंगली होती भव्य दिव्य रॅलीनंतर अनुराधा नागवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी मला सगळीकडे गोर गरीब लोकांचा सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या आशीर्वादावर विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला
उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहरातील जोधपूर मारुती चौकात महाविकास आघाडीची सभा झाली त्यात बोलताना राजेंद्र नागवडे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे भाषण करत पाचपुते कुटुंबात उमेदवारी बदलण्याच्या सुरु असलेल्या हालचाली वरून आ बबनराव पाचपुते यांच्यावर जोरदार तोफ डागली श्रीगोंद्याची बारामती करू असे सांगणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी तालुक्यात एमआयडीसी,कुकडी प्रश्न यावरून तालुक्यातील लोकांना झुरवत ठेवले पाचपुते यांच्यामुळे तालुक्याची "भानामती" झाल्याची टीका राजेंद्र नागवडे यांनी करत महाविकास आघाडीचे सरकार येणार असून आपल्या पत्नी अनुराधा नागवडे यांना मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्या भरघोस मतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला तसेच माजी आमदार राहुल जगताप व घनश्याम शेलार यांनी सोबत येण्याचे आवाहन केले
*मशालमय वातावरण*
आज अनुराधा नागवडे यांच्या रॅलीत खऱ्या खुऱ्या मशाली हातात घेऊन काही कार्यकर्ते नाचत अनुराधा नागवडे यांच्या नावाच्या घोषणा देत होते,हातात भावी आमदार चे ब्यानर,हातात पेटती मशाली घेऊन नाचणारे कार्यकर्ते यामुळे वातावरण मशाल मय झाले होते आजच्या या रॅलीत महिलांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली महिलांसह तरुण, वयोवृद्ध कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती
*तर तो शब्द जगताप यांना*
शिवसेना पक्षाने विधानपरिषदेचा शब्द साजन पाचपुते यांना दिला आहे साजन यांनी मोठेपणा दाखवत तो शब्द राहुल जगताप यांना देण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या सोबत यावे साजन यांचा विधानपरिषदेचा शब्द त्यांना देऊ तिथे आमदार होण्यासाठी मदत करू,तसेच कुकडी कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत राहुल जगताप,घनश्याम शेलार यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचे आवाहन आज जाहीर सभेतून राजेंद्र नागवडे यांनी केले त्याला राहुल जगताप व घनश्याम शेलार कसा प्रतिसाद देतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे
यावेळी बोलताना स्व. सदाशिव पाचपुते यांच्या पत्नी सुनंदा काकी पाचपुते यांनी आपला मुलगा साजन हा वयाने लहान आहे पण त्याने जो मनाचा मोठेपणा दाखवत नागवडे कुटुंबाला मदत केली त्याचा अभिमान वाटतो असे सांगितले तसेच आपले पती स्व सदाशिव पाचपुते यांनी कुठलेही पद घेतले नाही कुणाची लाचारी केली नाही तरी ते मास्टरमाईन्ड होते असे सांगत अनुराधा नागवडे यांना विजयी करण्यासाठी राहुल जगताप आणि घनश्याम शेलार यांनी सोबत येण्याचे आवाहन देखील सुनंदा पाचपुते यांनी केले
यावेळी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,विजय शेंडे,साजन पाचपुते यांची भाषणे झाले प्रशांत गोरे यांनी सूत्रसंचालन केले
वंचित बहुजन आघाडीचे दादा पाडळे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला
जोरदार शक्तीप्रदर्शन,जिंकण्याचा आत्मविश्वास, 'या'नेत्यांना सोबत येण्याचे आवाहन!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: