प्रशासक न्यूज,दि.२८ऑक्टोबर २०२४
श्रीगोंदा विधानसभा निवडणूकिसाठी आज शिवसेना(ठाकरे गट)पक्षाकडून अनुराधा नागवडे यांनी तर भाजप कडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या उपस्थित होत्या
नागवडे,पाचपुते यांच्यासह आण्णासाहेब शेलार यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच घनश्याम आण्णा शेलार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला
अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी मोठं शक्तीप्रदर्शन केले शहरातील जोधपूर मारुती चौक ते शनीचौकापर्यत मोठी रॅली काढण्यात आली होती महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
राजेंद्र नागवडे,बाबासाहेब भोस,दीपक नागवडे,सुनंदा पाचपुते,साजन पाचपुते यांच्या उपस्थितीत अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
तर पाचपुते यांच्याकडून शक्तीप्रदर्शन न करता साधेपणाने मोजक्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपच्या चित्रा वाघ,आ बबनराव पाचपुते,विक्रम पाचपुते,सचिन जगताप हे उपस्थित होते ल त्यानंतर पाचपुते यांच्या माऊली या निवासस्थानी छोटेखानी सभा झाली
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की,विक्रम पाचपुते यांचे भाषण ऐकून बबनराव पाचपुते यांच्या जुन्या भाषणाची आठवण झाली नेत्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते हीच खरी नेत्यांची संपती असे मत त्यांनी व्यक्त केले आमदार बबनराव पाचपुते यांच्या भाषणावेळी काही कार्यकर्ते भावुक झाले
या प्रमुख नेत्यांनकडून आज उमेदवारी अर्ज दाखल!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: