प्रशासक न्यूज,दि.२९ऑक्टोबर २०२४
विशाल अ चव्हाण
महाविकास आघाडीतील तिकीट वाटपात डावले गेलेले माजी आमदार राहुल जगताप हे आता निवडणूक लढवण्यावर ठाम असून आज त्यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर शहरातील शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी प्रचाराचा नारळच फोडून टाकला त्यामुळे जगताप यांनी माघारीचे दोर कापून टाकले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही राहुल जगताप हे अपक्ष उमेदवारी करणार हे निश्चित झाले असून त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे श्रीगोंद्यात महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे जगताप यांच्या प्रमाणेच घनश्याम शेलार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
आज माजी आमदार राहुल जगताप यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना राहुल जगताप यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत मी आता कुणाचेच फोन घेणार नाही तडजोडीच्या राजकारणात माझा बळी गेला असून आता कुणाला तडजोड करू देणार नाही मी माघार घेणार नाही फॉर्म ठेवणार आणि पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असे म्हणत जगताप यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले या सभेचे अध्यक्षपद केशव मगर यांनी भूषवले यावेळी बोलताना जगताप यांनी माझ्या उमेवारीचा निर्णय मुंबईत होणार नसून तो आता श्रीगोंद्याची जनता करणार आहे असे ठणकावून सांगितले
*तर ते माझा एका गोळीत बळी घेतील*
समोरच्या भाजप उमेदवारला निधी वाटपातून टक्केवारीचे भरपूर पैसे आलेत तर दुसऱ्या उमेदवाराला एनसीडीसीचे १२० कोटींचे कर्ज मिळालंय पण माझं तस नाहीये मी फक्त तुमच्या शब्दावर निवडणूक लढवतोय फॉर्म ठेवायचा कां काढायचा तुम्हीच सांगा तुम्ही सोबत राहणार असाल तर मी निवडणूक लढवतो तुम्ही नीटनेटके माझ्यासोबत रहा जर कां तुम्ही गडबड केलीत तर समोरचे माझा एका गोळीत बळी घेतील असे जगताप उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले त्यावर उपस्थितानी हात उंचावून त्यांना उमेदवारी करा असा प्रतिसाद दिला यावेळी जगताप हे भावुक झाले होते
*जनता हेच माझं कवच*
समोरच्या एका उमेदवारला भाजप चे आणि दुसऱ्या उमेदवाराला शिवसेनेचे कवच आहे माझ्याकडे कुठल्या पक्षाचे कवच नसले तरी आता जनता हेच माझं कवच आहे तिकीटापेक्षा जनतेच प्रेम खूप मोठं आहे असे जगताप यांनी सांगत
माझ्यावर वरिष्ठ नेत्यांनी अन्याय केला असला तरी अपक्ष उभा राहून मीच तुतारी फुंकणार असे त्यांनी ठामपणे सांगितले
मी प्रामाणिक राहिलो हीच माझी चूक असल्याचे सांगत ही निवडणूक निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा कां नाही हे महाराष्ट्रातील नेत्यांना धडा शिकवणारी निवडणूक ठरणार असल्याचे जगताप यांनी सभेत बोलताना सांगितले
तसेच अपक्ष निवडून आल्यावर कुकडी घोड सकाळाई प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे सांगतानाचा आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्वप्नातील सतत फिरत राहणारी एमआयडीसी कुठंतरी थांबवली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार असे सांगत त्यांनी आ पाचपुते यांचा चांगला समाचार घेतला
मी स्व शिवाजीराव नागवडे यांना कधीच विसरलो नाही हे सांगतानाच बापूंच्या विचारांचा मी खरा वारसदार असल्याचे जगताप यांनी सांगितले
यावेळी अतुल लोखंडे,उत्तम डाके,दीपक भोसले,अकतार शेख,हरिदास शिर्के,संभाजी देविकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रचाराचा नारळ फुटला,माघारीचे दोर कापले!अन्यथा माझा बळी घेतील...!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: