प्रशासक न्यूज,दि.३०ऑक्टोबर२०२४
मी स्वतःच्या स्वार्थासाठी कधी पक्ष बदलला नाही फक्त जनतेचे हीत डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष बदलले असे मत प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभेच्या मैदानात उतरलेले घनश्याम शेलार यांनी व्यक्त केले आज सायंकाळी शेलार यांच्या श्रीगोंदा शहरातील संपर्क कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शेलार बोलत होते
*म्हणून लोकसभेला मी थांबलो*
लोकसभेला मी अपक्ष निवडणूक लढवणार होतो परंतु माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शब्दावर निवडणूक न लढवता मी थांबलो माझा वापर करून घेणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देताना मात्र आपला विसर पडतो असे शेलार यांनी सांगितलेयावेळी श्रीगोंद्याच्या विकासासाठी प्रहार च्या वतीने तयार करण्यात आलेली २१ कलमी कार्यक्रमाची ब्लु प्रिंट सादर करण्यात आली यामध्ये घोड,कुकडी साकळाई प्रश्न,डिंभे माणिकडोह बोगदा, उपजिल्हा रुग्णालय,तरुणांसाठी रोजगार अश्या मुद्द्यांचा समावेश आहे
*लुटारुंना आमदारकी कशी मिळते*
आमदार बबनराव पाचपुते यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले,कारखान्यातील कामगारांचे पैसे दिले नाहीत अशी गरिबांची लूट करणाऱ्या व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी कशी मिळते आणि लोकही त्यांना मतदान कसे करतात असा प्रतिप्रश्न कडू यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करून ३५ वर्ष्यापासून तालुक्याचे प्रश्न जैसे थेच आहेत त्याबाबत तुम्ही तुमच्या आमदारांना जाब विचारा असे कडू यांनी सांगितले
राज्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे ३५ उमेदवार या निवडणुकीत उभे केले असून त्यामध्यमातून राज्याला एक वेगळा संदेश देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले
तसेच भाजप आणि काँग्रेस सरकारच्या बजेट ची डिझाईन सारखीच असून बजेटमध्ये शहरांना झुकत मापं तर ग्रामीण भागावर कायम अन्याय केला जातो तीच डिझाईन प्रहार स्टाइलने बदलण्याचे काम करणार असल्याचे कडू यांनी सांगितले
*गुवाहाटीला गेलो पण..*
तुम्ही ज्या सरकारवर टीका करताय आपण त्या सरकारचा भाग होतात गुवाहाटीला आपणही गेला होतात याबाबत पत्रकारांनी विचारले असता काहीवेळा चांगल काम करण्यासाठी तडजोड करावी लागते आपण गुवाहाटीला गेलो पण त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाची स्थापना तरी झाली असे मत त्यांनी व्यक्त केले
या पत्रकार परिषदेसाठी शेलार यांच्या समर्थकांसह प्रहार चे तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी पक्ष बदलले,आण्णांचा 'प्रहार'!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ३०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: