प्रशासक न्यूज,दि.९ऑगस्ट
नागपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. घरातील टीव्हीच्या सेटअप बॉक्सला हात लावताच शॉक लागून 4 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. हिंगणा तालुक्यातील खैरी पन्नासे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे. घरातील इलेक्ट्रिक वस्तूंपासून मुलांना दूर ठेवणे आवश्यक आहे हे या घटनेतून कळते. अन्यथा मुलांकडे थोडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हिंगणा तालुक्यातील खैरी पन्नासे गावातील चव्हाण कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली. चव्हाण यांचा 4 वर्षाचा मुलगा घरी खेळत होता. खेळता खेळता मुलगा टीव्हीजवळ गेला. त्यानंतर टीव्हीचा सेटअप बॉक्स हातात घेऊन ओढू लागला. यावेळी त्याला शॉक लागला आणि तो बोशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ हिंगणा रुग्णालयात रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे ऐकताच आई-वडिलांना धक्का बसला आहे
सेटटॉप बॉक्स ला हात लागला आणि---पुढे जे घडले ते भयंकर
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: