नायब तहसीलदारांकडून थेट आदिवासी पाड्यावर जाऊन मतदारांची नोंदणी!


प्रशासक न्यूज, दि.१३ऑगस्ट

मतदारांमध्ये मतदाननाविषयी जनजागृती करणे १८वर्षे वय पूर्ण झालेल्या नवमतदार तरुण तरुनींनी आपले मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे तसेच आदिवासी,भटक्या, विमुक्त समाजातील लोक ऊसतोड कामगार यांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सध्या निवडणुक आयोगामार्फत विशेष मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे

या अभियाना आंतर्गत श्रीगोंदा तहसीलचे नायब तहसीलदार पंकज नेवसे हे आदिवासी पाडा,भटक्या विमुक्त समाजाचे लोक यांच्या पालावर जाऊन ज्यांचे अजून मतदार यादीत नाव समाविष्ट नाहीं त्यांचे नाव नोंदणी करून घेत आहेत मतदार नोंदणी बाबत मार्गदर्शन करत आहेत

भारत निवडणूक आयोगाची विशेष मतदार नोंदणी मोहीम नेवसे यांनी प्रभावीपणे राबवली असून आतापर्यत त्यांनी तालुक्यातील विविध महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या,आदिवासी पाडे याठिकाणी जाऊन मतदार यादीत नाव नोंदवण्याबाबत जनजागृती केली आहे तसेच तेथील बिएलओ सहित जाऊन नवं मतदारांचे त्याठिकाणी फॉर्म भरून घेतले आहेत

आज श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावर असलेल्या शिवपार्वती सोसायटी मध्ये आयोजित विशेष नवमतदार नोंदणी अभियाना आंतर्गत मतदारांना मार्गदर्शन करतांना नायब तहसीलदार पंकज नेवसे म्हणाले की मतदान करणे हा लोकशाहीने सर्वांना दिलेला अधिकार आहे त्यासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाने आपले मतदार यादीत नाव नोंदवून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येकाचे एक मत किती महत्वाचे आहे हे देखील त्यांनी उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक प्रशांत गोरे यांनी केले या भागाचे बीएलओ संदीप खेतमाळीस यांनी देखील मतदार आधार शी लिंक करून घेणे नवीन नाव नोंदणी करणे याबाबत आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले यावेळी अनेक नवमतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आले

या कार्यकमासाठी नगरसेवक प्रशांत गोरे,शिवपार्वती सोसायटीमधील अंबादास सकट भाऊसाहेब,लगड, राजू क्षीरसागर,संकेत क्षीरसागर,मलंग इनामदार,सुद्रिक,बोरुडे तसेच सनी कोथिंबीरे,प्रवीण शिंदे यांच्यासह महिला नवमतदार उपस्थित होते
नायब तहसीलदारांकडून थेट आदिवासी पाड्यावर जाऊन मतदारांची नोंदणी! नायब तहसीलदारांकडून थेट आदिवासी पाड्यावर जाऊन मतदारांची नोंदणी! Reviewed by Prashasak on ऑगस्ट १३, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.