ओव्हरटेक च्या नादात भीषण अपघात


प्रशासक न्यूज,दि.१२ऑगस्ट

अलीकडे रस्ते चांगले झालेत त्यामुळे लोकांचा प्रवास सुकर झाला आहे चांगल्या रस्त्यामुळे लोकांचा वेळ वाचत आहे असे एकीकडे असताना दुसरीकडे मात्र हलगर्जीपणाने वाहन चालवल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव नजिक निलगिरी धाब्याजवळ दौंड नगर रस्त्यावर एक मालवाहतूक करणारा छोटा टाटा टेम्पो(छोटा हत्ती)व पिकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तिघांवर अ नगर येथे उपचार चालू आहेत जखमी हे राहुरी तालुक्यातील राहिवासी असल्याची माहिती समजली

अपघातात गंभीर जखमी असलेल्यानावर उपचार चालू असल्यामुळे अद्याप बेलवंडी पोलीस स्टेशनला या अपघात प्रकरणी काहीच दाखल करण्यात आलेले नव्हते

समजलेल्या माहितीनुसार ओव्हरटेक करण्याच्या नादात या दोन वाहनामध्ये समोरासमोर जबरी धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या आहेत
ओव्हरटेक च्या नादात भीषण अपघात ओव्हरटेक च्या नादात भीषण अपघात Reviewed by Prashasak on ऑगस्ट १२, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.