प्रशासक न्यूज,दि.५ऑगस्ट
चार ते पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही अद्यापही पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. काही भागांमध्ये तर, पाऊस फक्त तोंडओळख करून देण्यासाठीच आला होता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. असा हा पाऊस पुढील चार दिवसांमध्ये विदर्भासह कोकण भागामध्ये मुसळधार बरसणार आहे. रागयग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एकिकडे जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोकणातील बहुतांश भागांमध्येही पावसानं उघडीप दिली. पण, आता मात्र या भागावर पुन्हा एकदा काळ्या ढगांची चादर आल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी कोकणाला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
कोकणाल मुसळधारीचा अंदाज असतानाच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागालाही पाऊस ओलाचिंब करणार आहे. तर, राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरावरही पावसाची कृपा राहणार असून, इथं दाट धुक्यांची चादर पाहायला मिळणार आहे.कोल्हापूर, साताऱ्यातही परिस्थिती काहीशी अशीच असेल.
पुढील चार दिवस पुन्हा पाऊसधारा
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०४, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०४, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: