प्रशासक न्यूज,दि.९ऑगस्ट
अलीकडे माणसं मनाने कमकुवत बनत चालली आहेत परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत त्यांच्यात उरलेली नाहीं किरकोळ करणातून स्वतःचे जीवन संपवल्याच्या घटना अलीकडे सर्रास घडतं आहेत अशीच एक घटना दौंड तालुक्यात घडली आहे
कोणत्याही व्यक्तीला घडवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाबद्दल नकोश्या बातम्या समोर येत असतानाच काही घटना खरोखरच आजही शिक्षक अत्यंत तळमळीने काम करत असतात. आपलं सर्वकाही झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक तसे दुर्मिळच. पण असाच काहीसा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यामध्ये घडला आहे. सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने एका शिक्षकाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आहे
समोर आलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार दौंड तालुक्यामधील जावजीबुवाचीवाडी येथे घडला आहे. जावजीबुवाचीवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अरविंद देवकरांनी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जाणं इतकं मनावर घेतलं की त्यांनी स्वत:लाच संपवलं. सर्वच्या सर्व विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने अरविंद यांनी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. अगदी 2 महिन्यांपूर्वीच अरविंद यांची या शाळेत बदली झाली होती.
गावातील छोट्याश्या शाळेची दुरावस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अऱविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना पटला नाही. त्यांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व 10 विद्यार्था शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झालं. चांगलं काहीतरी करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्यांनी तणनाशक औषधाचं सेवन करुन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिट्ठी समोर आली आहे
शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल,कारण ऐकून व्हाल थक्क!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: