प्रशासक न्यूज,दि.२७जुलै
ग्रामसूरक्षा यंत्रणेमार्फत चोर आल्याची माहिती समजताच त्याला तात्काळ प्रतिसाद देत पोलीस येण्याची वाट न पाहता पोलीस मित्रांसह गावात गस्त सुरु करून चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावण्याची घटना पिंपंळगावपिसा शिवारात घडली आहे या कामगिरीबाबत पिंपळगाव पिसा गावचे पोलीस पाटील शिवणकर यांची भेट घेत बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांना सन्मानित केले आहे
काल रात्री म्हणजे दि २६ जुलै रोजी रात्री खरातवाडी शिवारात चोरटे आल्याची माहिती रात्रीच्या गस्तीदरम्यान बेलवंडी पोलिसांना समजली त्यानंतर पो हे कॉ हसन शेख यांनी जवळच्या गावांना ग्रामसूरक्षा यंत्रणेमार्फत याबाबत सूचित केले
सदर माहिती पिंपळगावं पिसा गावचे पोलीस पाटील शिवणकर यांना समजताच त्यांनी ततत्काळ गावातील पोलीस मित्रांना सोबत घेऊन गस्त सुरु केली गस्त सुरु करताच त्यांचा आणि दुचाकीवरून आलेल्या चोरांचा समोरासमोर सामना झाला गस्ती पथकाला पाहून चोर पळून जाऊ लागले
त्यावेळी पोलीस पाटील शिवणकर यांनी स्वतःच्या चारचाकी वाहनाने या चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला त्यानंतर चोरांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यानी दुचाकी उसाच्या शेतात टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला
परंतु अश्याप्रकारे तत्परता दाखवत मोठ्या धाडसाने चोरट्याचा पाठलाग करत त्यांना पळवून लावल्याबद्दल पोलीस पाटील शिवणकर यांचे कौतुक होत आहे
पोलीस पाटलाची सतर्कता! सिनेस्टाईल पाठलाग आणि---
Reviewed by Prashasak
on
जुलै २६, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै २६, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: