प्रशासक न्यूज,दि.२६जुलै
सध्या एका वेगळ्या पद्धतीने झालेल्या लग्नाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगत आहे प्रत्येकाला आपले लग्न आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावे, असे वाटत असते. काही जणांनी हवेत म्हणजेच विमानात लग्न केले आहे. काही जणांनी पाण्यावर लग्झरी क्रूझवर लग्न लावले आहे. त्यापेक्षा वेगळे लग्न अहमदनगर जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली आहे. हे लग्न स्मशानभूमीत झाले आहे. नगर जिल्ह्यातील राहातामध्ये स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर वाजले. मांडव टाकला गेला. गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक झाली. अंधश्रद्धेला फाटा देत या जोडप्याने स्मशानभूमीत विवाह केला
आपल्याकडे स्मशान शुभ मानले जात नाही. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य त्या ठिकाणी होत नाही. परंतु गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानत करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी लग्नाच्या सर्व पारंपारिक परंपरा करण्यात आला. धुमधडाक्यात हे लग्न झाले. शिक्षित युवक मनोज जयस्वाल याने गंगाधर गायकवाड याच्या या निर्णयास पाठिंबा दिला.
ऐकावे ते नवलंच!त्या आगळ्यावेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा
Reviewed by Prashasak
on
जुलै २५, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै २५, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: