प्रशासक न्यूज,दि.३०जुलै
एकच रात्रीत चार गावांमध्ये २४ बंद घरे फोडत चोरट्यानी एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे
साताऱ्यातील वाई तालुक्यात पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 बंद घरे फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री चार गावांमध्ये झालेल्या घरफोड्यांमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोने आणि रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. एकाच वेळी 24 घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सातारा पोलिसांनाच आव्हान दिल्याचे म्हटलं जात आहे. महत्वाचे म्हणजे ही सर्व 24 घरे बंद होती. या बंद घरांची कुलपे तोडून मोठा ऐवज लंपास करण्यात आला आहे.या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाई तालुक्यात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी या गावांमध्ये धुमाकूळ घातला होता. चोरट्यांनी एकाच रात्रीत 24 बंद घरांची कुलूपे घरे तोडून सोने व रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणातील फक्त गुन्ह्यांची नोंद करण्याचेच काम सुरु होते. दुसरीकडे या चोरीच्या घटनांमुळे चारही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा!
Reviewed by Prashasak
on
जुलै २९, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै २९, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: