अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी


प्रशासक न्यूज,दि.१६फेब्रुवारी

अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. यामध्ये काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. तर काही वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव येथील रंगोली हॉटेल समोर घडली.
याप्रकरणी विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिलेसह अज्ञात 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लग्न समारंभात अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे ओंकार सातपुते यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर सातपुतेंच्या मालकीचे हॉटेलवर कर्डिलेंच्या मुलाने आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन तुफान दगडफेक केली.
या दगडफेकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉटेलमध्ये आलेले काही ग्राहकही जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलीस तपास सुरु आहे.

अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी Reviewed by Prashasak on फेब्रुवारी १५, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.