प्रशासक न्यूज,दि.१०डिसेंबर
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार आज श्रीगोंदा दौऱ्यावर येत आहेत सकाळी अकरा वाजता ते पिंपळगावपिसा येथे कुकडी कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत
त्याच्या आधीच श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या तालुकाध्यक्षांनी आपल्याला पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये योग्य स्थान व न्याय वागणूक मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांना पत्रव्यवहार केला आहे त्याची प्रत माजी आमदार राहुल जगताप व घनश्याम शेलार यांना देखील देण्यात आली आहेत्यामुळे आज होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अजित पवार या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीची दखल घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा मीनल भिंताडे,सेवा दल तालुकाध्यक्ष श्याम जरे,सा.ना तालुकाध्यक्ष संदीप उमाप,अल्पसंखांक तालुकाध्यक्ष आजीम जकाते,युवती तालुकाध्यक्ष ऍड दीपाली बोरुडे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस,सा न्या शहराध्यक्ष जितेंद्र पाटोळे यांच्या या पत्रावर सह्या आहेतयाआधी सुद्धा बाजारसमितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना डावल्याचा आरोप ऍड दीपाली बोरुडे यांनी करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे
पक्षाचे विविध कार्यक्रम,पोस्टर्स,जाहिराती,कार्यक्रमस्थळी व्यासपीठ यासारख्या प्रसिद्धी माध्यमांपासून कायमच आपल्याला वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी तालुकअध्यक्षांना दिलेल्या पत्रात केला आहे
पदाधिकाऱ्यांच्या या नाराजीबाबत तालुक्यातील नेते कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
श्रीगोंदयात राष्ट्रवादीत नाराजी!अजित पवार लक्ष घालणार का?
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०९, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०९, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: