देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला,पाच जण जागीच ठार


प्रशासक न्यूज,दि.४ऑक्टोबर

तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना रस्त्यात आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात एसटी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूर - उदगीर मार्गावरील लोहारा गावाजवळ घडली आहे या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर बसमधील 10 प्रवासी जखमी झालेत. ठार झालेले हे कारमधील प्रवासी आहेत. एका गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

उदगीर येथून कुटुंब कारने सकाळी निघाले होतं. कारमधून सहा जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर मार्गावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एसटी बसवर जाऊन जोरदार धडकली. यात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त बस ही उदगीरहून चाकूरला जात होती. कार आणि एसटीची समोरासमोर झालेली ही धडक एवढी भीषण होती की या बसचे समोरील चाक निखळून बाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी हे तुळजापूर येथे देवदर्शनाला निघाले होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

उदगीर - नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीजवळ हा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात हलवले.

या अपघातात अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख आणि चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर यांचा मृत्यू झाला. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला,पाच जण जागीच ठार देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला,पाच जण जागीच ठार Reviewed by Prashasak on ऑक्टोबर ०४, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.