उद्या शरद पवार यांच्या हस्ते महेश्वर मल्टिस्टेट च्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा


प्रशासक न्यूज,दि.१५सप्टेंबर

महेश्वर मल्टीस्टेट को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या संस्थेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय खा. श्री शरदचंद्रजी पवार यांचे शुभहस्ते शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता संपन्न होत असून, सदरचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय श्री. घन:शाम(अण्णा) शेलार हे भूषविणार आहेत.

महेश्वर मल्टीस्टेट को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची स्थापना दिनांक 25 ऑगस्ट 2011 रोजी झालेली असून, सोसायटीच्या श्रीगोंदा, दौंड, शिरुर आणि नगर या तालुक्यांमध्ये 11 शाखा कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महेश्वर या नावानेच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था असून, पतसंस्थेच्याही 5 शाखा कार्यरत आहेत.

महेश्वर मल्टीस्टेट सोसायटीने अवघ्या 10 वर्षाच्या कालावधीत 133 कोटींच्या ठेवी जमा केलेल्या आहेत. तर, आजतागायत समाजातील गरजु घटकांना 90 कोटींच्या दरम्यान कर्ज वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे महेश्वर पतसंस्थेने देखील 65 कोटींच्या ठेवी जमा केलेल्या असून, साधारणत: 40 कोटींच्या दरम्यान कर्ज वाटप केलेले आहे.

महेश्वर मल्टीस्टेट सोसायटी आणि महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था या दोन्ही युनिटच्या माध्यमातून 16 शाखा कार्यरत असून, 16 शाखांच्या सेवेमध्ये असलेले एकूण 85 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 198 कोटींच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. कर्जवाटपही 130 कोटींचे पुढे झालेले आहे.

संस्थेने दैनिक कलेक्शन जमा करणे, ठेवी जमा करणे व त्या माध्यमातून कर्ज वाटप करणे,.. एवढे माफक उद्दिष्टये न ठेवता बँकींग मधल्या अत्याधुनिक स्वरुपाच्या सेवा - सुविधा ग्राहकांना देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कोअर बँकींग सुविधा, एस.एम.एस सुविधा, अधिकृत वीज बील भरणा केंद्र, लॉकर सुविधा, मिनी ATM सुविधा, RTGS/NEFT सुविधा इत्यादी सुविधांचा समावेश आहे. म्हणूनच आज पतसंस्थांकडे मिनी बँक म्हणूनच पाहिले जात आहे.

लवकरच संस्थेमार्फत QR कोड, मोबाईल बँकींग, IMPS सुविधा तसेच, शुअरसेल सेवेचा शुभारंभ होत आहे. हे सांगण्यात आनंद वाटतो. यापुढील काळात देखील बँकींग मधील अत्याधुनिक स्वरूपाच्या सेवा - सुविधा कशाप्रकारे देता येतील, याबाबत निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न केले जातील. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चेअरमन गावडे यांनी माध्यमांना दिली आहे.

त्याचबरोबर फक्त ठेवी जमा करणे व त्याद्वारे कर्ज वाटप करणे एवढयावरच न थांबता बॅकींगमधील जास्तीत जास्त सेवा - सुविधा पतसंस्थेमार्फत राबविल्या जात आहेत. म्हणून पतसंस्थांना ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा म्हणूनही संबोधले जात आहे. असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

महेश्वर परिवाराने नेहमीच ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत अर्थसेवा पोहचावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. सहकाराच्या माध्यमातून गावं आणि गावाकडची माणसं अधिकाधिक सक्षम आणि समृध्द व्हावीत.. हेच महेश्वर परिवाराचे ध्येय आहे. याकामी सर्व संचालक मंडळ, संस्थेचे अधिकारी, सेवक यांचेबरोबरच संस्थेचे ठेवीदार त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व ग्राहक यांचेही या संस्थेच्या सर्वांगीन भरभराटीमध्ये मोलाचे योगदान आहे. असे त्यांनी यावेळी विशेष नमूद केले आहे.
उद्या शरद पवार यांच्या हस्ते महेश्वर मल्टिस्टेट च्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या शरद पवार यांच्या हस्ते महेश्वर मल्टिस्टेट च्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा Reviewed by Prashasak on सप्टेंबर १५, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.