बसस्थानकात प्रवाश्यांचे दागिने चोरणाऱ्या महिला जेरबंद


प्रशासक न्यूज,दि.१४सप्टेंबर

श्रीगोंदे बसस्थानकावर बसमध्ये चढताना व बसमध्ये बसलेल्या प्रवाशी महिला व वाटसरू प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या तीन महिला व एका पुरुषास श्रीगोंदे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या पथकाने शेवगाव येथे घेतलेल्या शोध मोहिमेत जेरबंद करून अटक केली. या चोरट्यांकडून सुमारे अडीच लाखाचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत

दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी अर्चना गणेश खलाटे (वय ३०, रा. लोणी व्यंकनाथ) यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली हाेती की ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भावाच्या लग्नासाठी मिरजगाव येथे जाण्यासाठी श्रीगोंदे बसस्थानकावर स्वारगेट ते आष्टी जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने माझ्या पर्समधील सोन्याचे दागिने लांबवले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला बसस्थानक व शहरातील २० सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यास सांगितल्यावर गुन्हेगार शेवगाव येथील असल्याची खात्री पटली. शेवगाव तालुका गुन्हेगारी वस्त्यांवर ९ सप्टेंबर रोजी शोध मोहीम घेतली असता संशयित आरोपी महिला सोनाली विजय काळे (वय २२), काजल विजय काळे (वय २१), कार्तिका शर्मा चव्हाण (वय ३८) व लखन विजय काळे (वय २५, सर्व रा. पाथर्डी रोड, शेवगाव) यांना ताब्यात घेतले.

पोलिस कोठडीत असताना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेले ४६ ग्रॅम वजनाचे २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील आरोपी लखन विजय काळे याच्यावर यापुर्वी शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.
बसस्थानकात प्रवाश्यांचे दागिने चोरणाऱ्या महिला जेरबंद बसस्थानकात प्रवाश्यांचे दागिने चोरणाऱ्या महिला जेरबंद Reviewed by Prashasak on सप्टेंबर १३, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.