प्रशासक न्यूज,दि.२२सप्टेंबर
श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक 84 विद्यार्थी नगर जिल्ह्य़ातील 18 आदर्श शिक्षक व श्रीगोंदा तालुक्यातील चार फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त शाळांना सन्मान पत्र देऊन गौरव केला पुढील वर्षी पासून नगर जिल्ह्य़ातील 15 क्रीडा शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत .
हा गौरव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उद्योजक प्रकाश कुतवळ प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील गटविकास अधिकारी राम जगताप गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य गीता चौधरी यांच्या हस्तेे केला
संभाजी लांगोरे म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थी खेळाडू शाळा केंद्रबिंदू मानुन सामाजिक जाणीवेतून अतिशय चांगले उपक्रम हाती घेतले आहेत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे
प्रकाश कुतवळ म्हणाले कि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे तरच भारत महासत्ता होऊ शकतो.
भास्कर पाटील म्हणाले कि अग्नीपंख फौंडेशनने जिल्ह्यातील आदर्श प्राथमिक शिक्षकांचा सन्मान केला याचा शिक्षण क्षेत्रात चांगला संदेश जाणार आहे
नवनाथ दरेकर म्हणाले कि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षीपासून नगर जिल्ह्य़ातील 15 क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे
यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे विकास चव्हाण मल्हारी शिर्के यांची भाषणे झाली
यावेळी सचीन लगड नानासाहेब कोथिंबीरे किसन वऱ्हाडे अमोल गव्हाणे बापूसाहेब हिरडे विजया लंके सविता शिंदे शुभांगी लगड उपस्थित होते सुत्रसंचलन विलास लबडे यांनी तर आभार मधुकर काळाणे यांनी मानले
सत्कारमूर्ती
आदर्श शिक्षक
भाऊसाहेब गायकवाड राहुरी, बाळासाहेब दळवी नगर,संतोष सदगीर अकोले,अशोक शेटे संगमनेर,सुदाम सांळुके कोपरगाव,भीमराज शेळके राहाता,तरन्नुम खान श्रीरामपूर,विद्याताई उदावंत राहुरी,सुमन तिजोरे नेवासा,सविता बुधवंत शेवगाव,आण्णासाहेब सांळुके पाथर्डी,अनिता पवार जामखेड,नवनाथ दिवटे कर्जत,भावना मोहीते श्रीगोंदा,ज्योती साबळे पारनेर,शरद घलपे नगर,राजेंद्र पोटे श्रीगोंदा,शोभा कोकाटे श्रीगोंदा,
फाईव्ह स्टार मानांकन शाळा...
देशमुखवस्ती शिरसगाव बोडखा,कोंथिबीरे मळा श्रीगोंदा,खामकरवाडी टाकळीकडेवळीत,सेक्रेट हार्ट स्कुल कोळगाव
देशमुखवस्ती शिरसगाव बोडखा,कोंथिबीरे मळा श्रीगोंदा,खामकरवाडी टाकळीकडेवळीत,सेक्रेट हार्ट स्कुल कोळगाव
विद्यार्थी शिक्षक शाळांचा सन्मान अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २२, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर २२, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: