महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी सुरू


प्रशासक न्यूज दि.२७सप्टेंबर

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद लाईव्ह पाहता येणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठामध्ये होत आहे.

महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होत आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी सुरू महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी सुरू Reviewed by Prashasak on सप्टेंबर २६, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.