प्रशासक न्यूज,दि.३१ऑगस्ट
विकृतीची परीसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शौचालयासाठी गेलेल्या ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तुळजापूर भागात घडली आहे.
6 वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या घराजवळच्या शेतात शौचासाठी गेली. त्यावेळी आरोपीने संधी साधून तिला उचलून गेलं. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या महिला काय घडलं ते पाहण्यासाठी आल्या.
आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने महिलां तिला वाचवण्यासाठी आल्या. या महिलांनी आरोपीला बेदम चोप दिला. या महिलांनी नराधमाच्या तावडीतून सुखरुप सुटका केली. आरोपीला ग्रामस्थ आणि महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
महाराष्ट्र हादरला! शौचासाठी शेतात गेलेल्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ३०, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: