प्रशासक न्यूज,दि.२२डिसेंबर २०२५
विशाल अ चव्हाण
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक ही चौरंगी झाली असली तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)आणि महाविकास आघाडी यांना सुरुवाती पासूनच रंगत निर्माण करता आली नाही त्यामुळे ही लढत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी म्हणजेच आ विक्रम पाचपुते विरुद्ध मनोहर पोटे यांच्यातच रंगल्याचे पाहायला मिळाली
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पाचपुते यांची ही पहिलीच मोठी निवडणूक होती त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सत्त्वपरीक्षा घेणारी होती त्यामुळेच आ पाचपुते यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आ विक्रम पाचपुते यांनी या निवडणुकीत ग्राऊंड लेव्हल ला जाऊन काम केल स्वतः घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या या निवडणुकीत पाचपुतेनी त्यांची स्वतःची यंत्रणा उभी केली एका एका जागेसाठी मोठी मेहनत आमदारानी घेतली यात त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे त्यांचे बंधू प्रताप पाचपुते यांची आमदार विक्रम यांनी निवडणुकीची पूर्ण धुरा सांभाळली असली तरी प्रताप यांनी अंतर्गत यंत्रणा यशस्वीपणे सांभाळली आणि त्यामुळेच कुठेच चर्चेत नसलेल्या सुनीता खेतमाळीस यांना त्यांनी निवडून आणत श्रीगोंद्यात भाजपची एकहाती सत्ता काबीज केलीत्या उलट पाचपुते विरोधक एकत्र येऊन पाचपुतेना खिंडीत गाठण्यासाठी शुभांगी पोटे यांना उमेदवारी देतील असे वाटतं असतानाच पाचपुते विरोधकांमध्येच मोठी फूट पडल्याचे दिसून आले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वरून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील माजी आमदार राहूल जगताप आणि इतर नेत्यांमध्ये मतभेद दिसल्याचे पहायला मिळाले जगताप हे शुभांगी पोटे यांना राष्ट्रवादी ची उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते परंतु इतर नेत्यांचा त्याला विरोध होता तसेच राष्ट्रवादी चे नेते या निवडणुकीत पाहिजे तेवढ्या ताकतीने काम करताना दिसलें नाहीत सर्व जागेवर उमेदवार उभे करताना राष्ट्रवादी ची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले तशीच अवस्था महाविकास आघाडीची पहायला मिळाली जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी त्यांच्या सुनबाईना निवडणुकीच्या मैदानात उतरवले पण त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे अक्षरशः पानिपत झाले त्यांना एकही जागा मिळवता आली नाही त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी च्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे त्या उलट मनोहर पोटे यांनी एकाकी दिलेली झुंज ही दखलपात्र आहे परंतु मनोहर पोटे यांचा दोन जागेवर झालेला दारुण पराभव हा पोटेना विचार करायला लावणारा आहे तसेच मनोहर पोटे यांच्या शिवसेनेच्या प्यानेल मध्ये निवडून आलेल्यापैकी अनेकजण हे राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळे पोटे च्या प्यानेल ला जगताप यांनी रसद पुरवल्याची चर्चा आता होत आहे त्यातच मतदान झाल्यावर लगेच बाळासाहेब नाहाटा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यातून राष्ट्रवादी च्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेद उघड झाले होते पाचपुते विरोधकांमध्ये पडलेली फूट आमदार विक्रम पाचपुते यांची एका वर्षातील कार्यपद्धती विधानसभेतील त्यांची लक्षवेधी कामगिरी संयमाने आणि थंड डोक्याने त्यांनी हाताळलेली निवडणूक त्यांनी लावलेली तगडी यंत्रणा या सर्व गोष्टीमुळे या निवडणुकीत विरोधक पूर्णपणे क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळालेया निवडणुकीत आ विक्रम पाचपुते यांना चक्रव्यूहात अडकवण्याच्या प्रयत्नात असणारे नेतेच पाचपुते यांच्या राजकीय व्युहरचने पुढे फेल झाल्याचे दिसून आले तसेच विधानसभे प्रमाणे याही वेळेस आमदारांची संयमी खेळी यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाली उमेदवारी देण्यापासून ते त्यांना निवडून आणेपर्यत आ पाचपुते यांनी संपूर्ण ताकद आपल्या उमेदवारांच्या मागे उभी केली नगरध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना सुद्धा त्यांनी अत्यन्त सावध पवित्रा घेत कुठेही चर्चेत नसणाऱ्या सुनीता खेतमाळीस यांना उमेदवारी देऊन अंतर्गत गटबाजी होणार नाही याचीही संपूर्ण खबरदारी घेतली पाचपुते यांनी सुरुवातीपासूनच केलेल्या यशस्वी नियोजनामुळे त्यांनी त्यांचे नगराध्यक्षा सह तेरा शिलेदार निवडून आणले यात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे आ विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वात भाजपला श्रीगोंद्यात संपूर्ण बहुमत मिळाले आहे
*महिलांसह नवीन चेहेऱ्यांना संधी देण्यावर भर*
आ विक्रम पाचपुते यांनी एक हाती पद्धतीने ही निवडणूक हाताळली त्यात त्यांनी सर्व्हेच्या आधारावर उमेदवारी देण्यावर भर दिला त्यात नवीन आणि तरुण चेहेऱ्यांनी त्यांनी जास्त संधी दिली त्यातच महिला उमेदवारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात संधी दिली आणि ते यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले
काल लागलेल्या निकालात महिलांना मोठ्या प्रमाणात मतदारांनी निवडून दिल्याचे पाहायला मिळाले सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना यांच्यात मिळून एकूण १३ महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून नगराध्यक्ष या १४ व्या महिला असणार आहेत त्यामुळे २३ जणांच्या टीममध्ये एकूण १४ महिला या शहराच्या कारभारी असणार आहेत हे विशेष
एकूणच काय तर आमदारांनी ही निवडणूक अंत्यत गंभीर्याने घेत ती जिंकण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले त्या तुलनेत विरोधकांनी ही निवडणूक फारशी गंभीर्याने घेतली नाही त्यामुळे पाचपुतेच्या आभासपूर्ण प्लॅनींग पुढे सर्व विरोधक चितपट तर झालेच शिवाय मनोहर पोटे यांच्या सत्तेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात सुद्धा पाचपुते शंभर टक्के यशस्वी झाले
श्रीगोंद्यात पाचपुतें चा राजकीय 'प्रताप'...आणि विजयाचा "विक्रम"!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर २२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर २२, २०२५
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: