प्रशासक न्यूज,दि.१फेब्रुवारी२०२५
श्रीगोंदा शहरात हिंदू मुस्लिम समाजात ऐक्य आहे इथे कुठलाही धार्मिक वाद नाही असे असताना जर राज्याचे मंत्री नितेश राणे हे श्रीगोंद्यात येऊन वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणार असतील तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार असा ईशारा काल हिंदू मुस्लिम समाजातील तरुणांनी आयोजित केलेल्या सलोखा बैठकित बोलताना काही वक्त्यांनी दिलाश्रीगोंदा शहराची हिंदू मुस्लिम ऐक्याबाबत राज्यात नवलौकिक आहे शेख महंमद महाराज हे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत आहे श्रीगोंद्यात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहेत असे असूनसुद्धा काही लोक जाणीवपूर्वक इथे काही घटनाना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत श्रीगोंद्यात काही दिवसांपूर्वी दोन समाजात किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीना अटक केलेली आहे असे असून सुद्धा या गोष्टीला धार्मिक वळण देण्याचा आता प्रयत्न होत आहे त्याच पार्श्वभूमीवर मंत्री निलेश राणे श्रीगोंद्यात येत आहेत त्यांना विरोध दर्शवण्यासाठी आणि श्रीगोंद्यात दोन्ही समाजातील एकोपा टिकवण्यासाठी काल काही तरुणांनी पुढाकार घेत शेख महंमद महाराज मंदिरात बैठक घेतली
या बैठकीत राणे यांनी श्रीगोंद्यात येऊ नये यासाठी आमदार विक्रम पाचपुते पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करणार असा निर्णय झाला आणि तरी राणे श्रीगोंद्यात आलेच तर त्यांनी इथं येऊन महंमद महाराज यांचं दर्शन घेऊन परत जावं असं मत अनेकांनी यावेळी व्यक्त केल
यावेळी बोलताना सर्वांनीच हिंदू मुस्लिम सलोखा टिकवण्याबाबत आपला मत व्यक्त केल या बैठकीसाठी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,आजी माजी नगरध्यकक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह तरुण वर्ग उपस्थित होता
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी आणि पत्रकारांनी काळजी घेण्याची सूचना
काल झालेल्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर काही जणांनी नाराजी व्यक्त केली तर काही जणांनी संवेदनशील विषयावर बातमी लिहिताना पत्रकारांनी सुद्धा काळजीपूर्वक बातमी लिहून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण करणे टाळले पाहिजे अशी सूचना मांडली
तर त्यांना काळे झेंडे दाखवणार... कुणाला दिला ईशारा!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी ०१, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी ०१, २०२५
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: