प्रशासक न्यूज,दि.४डिसेंबर२०२४
श्रीगोंदा शहरात अनेकवेळा खासगी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीला विकल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत परंतु शहरातील एका मोक्याच्या ठिकाणी असलेली एका नामांकित संस्थेची जवळपास २७एकर जमीन एका व्यक्तीच्या मालकीची करण्यात आली असून या प्रक्रियेत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे
विशेष म्हणजे या खरेदी प्रक्रियेला विरोध करणाऱ्या तक्रारदाराने सुद्धा नंतर आपला जबाब बदलल्यामुळे ही संस्थेची जमीन विक्री प्रक्रिया अजूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे
या जमिनीच्या खरेदी प्रक्रियेत श्रीगोंद्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याला जवळपास २५लाख रुपयांची आर्थिक रक्कम देण्यात आली असून ही प्रक्रिया राबवण्यासाठी एका नेत्याला एक कोटी रुपयांची रक्कम दिली गेली असल्याची माहिती समजतं आहे
संस्थेची जमीन विकण्यासाठी एवढी मोठी रक्कम या अधिकाऱ्याने आणि नेत्याने घेऊन सुद्धा याबाबत माहिती असून देखील अनेकांनी मौन बाळगणे पसंत केले आहे हे विशेष त्यामुळे अश्या प्रकारे संस्थेची जमीन मोठा आर्थिक मलिदा घेऊन अश्या प्रकारे विक्री करण्याच्या या प्रकराची सत्यता समोर येणे गरजेचे आहे
संस्थेच्या जमिनीची विक्री,विक्री प्रक्रियेत 'त्या' अधिकाऱ्यासह नेता झाला मालामाल!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: