प्रशासक न्यूज,दि.२डिसेंबर२०२४
श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहते आता देखील अश्याच एका कारणामुळे पुन्हा श्रीगोंद्याचे राजकारण चर्चेत आले आहे शरद पवार यांचा आपण एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे सांगत साहेबांच्या आशीर्वादानेच अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे आणि निवडून आल्यावर आधी बारामतीला शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याचे ठामपणे सांगणारे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप हे मात्र आता पराभूत झाल्यानंतर थेट बारामतीच्या दादांच्या भेटीला गेल्यामुळे लवकरच ते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गोटात सामील होण्याची शक्यता व्यक्त होत आहे
याचे कारण म्हणजे आज राहुल जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचा फोटो प्रसार माध्यमामधून प्रसारित झाला त्यामुळे आता राहुल जगताप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ला रामराम करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी त प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी मात्र मोठ्या साहेबांसोबत राहणेच पसंद केले लोकसभेला सुद्धा जगताप हे महाविकास आघाडी सोबत राहिले त्यामुळे विधानसभेला राहुल जगताप हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे निश्चित वाटतं असतानाच राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार गटाला रामराम करत थेट शिवसेनेत प्रवेश करत शिवसेना(ठाकरे गटाची)उमेदवारी आपल्या पत्नी अनुराधा नागवडे यांना मिळवली त्यामुळे नाराज झालेल्या राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असे सांगत शरद पवार आपल्याच पाठीशी आहेत असा दावा करत निवडणूक लढवली एक निलंबनाच पत्र सोडता शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याने थेटपणे राहुल जगताप यांच्या विरोधात कुठलेच स्टेटमेंट न दिल्यामुळे आणि खासदार निलेश लंके हे श्रीगोंद्यात नागवडे यांच्या प्रचारासाठी न आल्यामुळे राहुल जगताप यांना शरद पवार यांचा छुपा पाठींबा असल्याचा संशय बळावला होता अपक्ष निवडणूक लढवून सुद्धा त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली
शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या राहूल जगताप यांनी मात्र आज थेट अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे अडचणीत आलेला कुकडी कारखाना आणि भविष्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जगताप अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते याला जगताप यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिल्यामुळे जगताप यांच्या प्रवेश निश्चित मानला जात आहे
राहुल जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास श्रीगोंद्याचे राजकारण पुन्हा बदलणार आहे
मोठ्या साहेबांची आता सोडून साथ,दादांच्या देणार हातात हात?
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: