प्रशासक न्यूज,दि.३सप्टेंबर २०२४
श्रीगोंदा पोलिसांनी बिगर क्रमांकाच्या दुचाकींवर सध्या कारवाईचा बडगा उगारला आहे ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे परंतु असे असले तरी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधील काही कर्मचाऱ्यांचीच दुचाकी वाहने विनाक्रमांक असल्याचे दिसत आहे त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांची ही कारवाई म्हणजे दिव्याखालीच अंधार असे म्हणायला हरकत नाही सामान्यांवर कारवाई करणारे पोलिसच नियम मोडत असतील तेच कायद्याचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई कोण आणि कधी करणार असा सवाल सामान्य जनतेला पडला असून पोलीस निरीक्षक साहेब आता या पोलीस कर्मचाऱ्यांकडे पण थोडं लक्ष असू द्या असा सुर नागरिकांन मधुन उमटत आहे
सदर पोलीस हे विनाक्रमांकाची वाहने का वापरत आहेत हे ही न उलगडलेले कोडं आहे कायद्याचे रक्षक असताना सुद्धा तेच अशी खुलेआम विनक्रमांक गाड्या वापरत आहेत मग त्यांच्यावर कसलीच कारवाई का होत नाही हाही प्रश्न आहे तसेच या पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीवर नंबर न टाकण्याची अडचण काय याबाबत ही साशंकता आहे
ही कारवाई म्हणजे लोकासांगे ब्रम्हज्ञान..
पोलीस ठाण्यातीलच कर्मचारी कायदा पायदळी मोडत आहेत आणि पोलीस मात्र सामान्य लोकांवर कायदा मोडला म्हणून कारवाई करत आहेत त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांची ही कारवाई म्हणजे लोकासांगे ब्राम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असाच प्रकार म्हणावा लागेल
*तपास करणाऱ्याचीच गाडी विनाक्रमांक*
दुचाकी चोरांची एक टोळी पोलिसांनी पकडली त्यात विनाक्रमांकाची दुचाकी सापडली त्यावरून हे रॅकेट उघड झाले पण याच्यावर कहर म्हणजे या प्रकरणाचा तपास करणाऱ्याच पथकातील कर्मचाऱ्याची गाडी विनाक्रमांक आहे हे विशेष
त्यामुळे आता सामान्यावर कारवाईचा बडगा उगरणारे पोलीस निरीक्षक त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली होत असताना काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
*कारवाईत सातत्य हवे*
श्रीगोंदा पोलिसांनी ट्रिपल सीट फिरणारे जोरात हॉर्न वाजवणारे विना नंबर गाडी वापरणारे,बेशिस्त पार्किंग करणारे यांच्याविरोधात जोरदार कारवाईची मोहीम उघडली आहे त्याबाबत श्रीगोंदा पोलिसांचे कौतुक होत आहे असे असले तरी ही कारवाई सातत्याने चालू ठेवून ती शहराच्या वेगवेगळ्या भागात राबवणे गरजेचे आहे
पोलिसांची ही कारवाई म्हणजे दिव्याखालीच अंधार!
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: