क्षुल्लक कारणावरून बाजारात तुंबळ हाणामारी,महिलांसह तीन ते चार जण जखमी श्रीगोंदा तालुक्यातील घटना


प्रशासक न्यूज,दि.९सप्टेंबर

दुचाकीवरील कॅरेटचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून शेतमाल विकण्यासाठी आलेला शेतकरी आणि मसाला विक्रेते व्यावसायिक यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत होऊन महिलेसह तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल दि.८सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील बाजारात घडली आहे भरदिवसा अशी तुफान हाणामारीची घटना घडल्यामुळे बाजारासाठी आलेल्या बाजारकरूंची एकच धावपळ उडाली

एवढी फ्री स्टाइल तुफान मारामारी होऊन सुद्धा दोन्ही बाजूकडील नेते मंडळींच्या मध्यस्थीमुळे या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झाली नाही हे विशेष.

या घटनेबाबत स्थानिक ग्रामस्थ व काही प्रत्यक्षदर्शीकडून समजलेली माहिती अशी की काल रविवारी विसापुर गावचा बाजार होता या बाजारात सकाळच्या वेळेस कोळगाव येथील एक मसाला विक्री करणारे नवरा बायको त्यांचे मसाल्याचे दुकान लावत होते त्याचवेळी पिंपळगावपिसा येथील एक शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी बाजारात आले ते तिथून जात असताना त्यांच्या दुचाकीवरील कॅरेटचा धक्का मसाला व्यवसायिकाच्या दुकानाला लागला यातून या दोघांमध्ये शाब्दिक वाद चालू झाला त्यानंतर हा वाद विकोपाला गेला त्यातून मसाला विक्री करणाऱ्या तीन चार लोकांनी या शेतकऱ्याला मारहाण केली त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे एक नातेवाईक तिथे आले परंतु त्यांना सुद्धा मसाला व्यवसायिकानी मारहाण केली त्यानंतर पिंपळगाव पिसा येथील शेतकऱ्याने आपल्या इतर नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले त्यानंतर बाजारात तीस ते चाळीस जणांचा जमाव तिथे आला आणि त्यांनी मसाला विक्री करणाऱ्या जोडप्यासह इतर मारहाण केलेल्या मसाला व्यवसायीकांना लाकडी दांडक्यानी जबर मारहाण केली यात मसाला विक्रेत्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शेतकरी आणि मसाला व्यावसायिक या दोन्ही बाजूकडील तीन ते चार लोक मारहाणीत जखमी झाले आहेत त्यानंतर बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमाव पांगवला दोन्ही बाजू कडील लोक बेलवंडी पोलीस ठाण्यात गेले परंतु राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला

परंतु एवढ्या किरकोळ कारणातून एवढी तुंबळ हाणामारी झाल्यामुळे परिसरात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली होती आणि दहशतीचे वातावरण पसरले होते

बाजारातील ओट्याची दुरावस्था झाल्यामुळे अनेक व्यावसायिक रस्त्यातच बसत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा होत असून त्यातून हे वाद होत असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे
क्षुल्लक कारणावरून बाजारात तुंबळ हाणामारी,महिलांसह तीन ते चार जण जखमी श्रीगोंदा तालुक्यातील घटना क्षुल्लक कारणावरून बाजारात तुंबळ हाणामारी,महिलांसह तीन ते चार जण जखमी श्रीगोंदा तालुक्यातील घटना Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.