श्रीगोंदा तालुक्यात अपघातांची मालीका सुरूच,दोन जणांचा मृत्यू!


प्रशासक न्यूज,दि.४सप्टेंबर २०२४

श्रीगोंदा तालुक्यातील दौंड-जामखेड व दौंड-नगर या महामार्गावरील अपघात मालीका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत काल रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास दौंड नगर रस्त्यावर निमगाव खलू शिवारात (नवीन टोल नाक्याच्या पुढे)दुचाकीला एका कंटेनर ने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बाळासाहेब गजाबा पवार वय(६२)रा.म्हसोबावाडी(अजनूज)यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत

तर आज बुधवार रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास दौंड जामखेड रस्त्यावर होळकर वस्तीनजीक झालेल्या एका विचित्र अपघातात अंदाजे वय ३०ते ३५वर्ष वयाच्या तरुणाचा दुचाकीच्या मागच्या चाकात गळ्यातील मफलर अडकल्यामुळे दुचाकी वरील नियंत्रण सुटून खाली पडल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून सदर मयत तरुण हा बीड जिल्ह्यातील केज भागातील असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून समजली आहे

श्रीगोंदा तालुक्यात काल रात्री आणि आज दुपारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन दुचाकी स्वारांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे

या अपघाता बाबत उपस्थित नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की काल रात्री बाळासाहेब पवार हे आपल्या पत्नी सह दुचाकीवरून आपल्या गावी म्हसबोबावाडीकडे जात असताना निमगाव खलू शिवारात कंटेनर ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला

सदर अपघाता बाबत पोलीस स्टेशनला कुठला गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता
श्रीगोंदा तालुक्यात अपघातांची मालीका सुरूच,दोन जणांचा मृत्यू! श्रीगोंदा तालुक्यात अपघातांची मालीका सुरूच,दोन जणांचा मृत्यू! Reviewed by Prashasak on सप्टेंबर ०४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.